नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी हे प्रमुख पाहुणे असू शकतात. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात कैरोमध्ये त्यांची भेट घेत त्यांच्यासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यास इजिप्तचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असेल. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारतात आल्यास अरब देशांमधील संबंधांमध्ये एक नवीन पर्व सुरू होणार आहे. 2023 मध्ये जी-20 शिखर परिषद भारतात होत असून नऊ देशांच्या यादीत इजिप्तच्या नावाचाही समावेश भारताने केला आहे. त्याचा फायदाही दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्यात होणार आहे.