केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती
State level sea swimming competition on 17th and 18th December at ‘Chiwala Beach’
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने बारावी (१२) राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा शनिवार १७ व रविवार १८ डिसेंबर रोजी ‘चिवला बीच’ मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत २६ जिल्ह्यातून सुमारे १५०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती उद्घाटन सोहळ्यास असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून दिली आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अशीही माहिती राजेंद्र पालकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्यासह जिल्हा बँक संचालक बाबा परब, निल लब्दे, डॉ. राहुल पंतवालावलकर, सुनील मयेकर, युसूफ चुडेसरा, राकेश पवार व अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्पर्धेची तारीख व नियोजन करण्यात आले.
मालवण / प्रतिनिधी