BJP will win hundred percent in Gram Panchayat elections in Malvan taluka
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शतप्रतिशत यश संपादन करेल. असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व भाजप पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
आगामी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर मालवण तालुका भाजप कार्यलय येथे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकारी यांची बैठक पार पडली. तालुक्यात सर्वच ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याविरोधात कोणी बंडखोरी केल्यास त्या बंडखोर उमेदवारांचे पक्षातून निलंबन करण्याबाबत प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवला जाईल. अशी स्पष्ट भुमिका पक्ष निरीक्षक अशोक तोडणकर यांनी मांडली.
मालवण / प्रतिनिधी