प्रतिनिधी /बेळगाव
येथील विद्याप्रसारक मंडळ ’सुवर्णमहोत्सव’ साजरा करत आहे. या निमित्ताने गजाननराव भातकांडे शाळेच्या प्रगतीचा पुढचा टप्पा असलेल्या भातकांडेज केंब्रिज
इंटरनॅशनल स्कूलचे शनिवारी उद्घाटन होत आहे.
कुंतीनगर खासबाग येथील भातकांडेज केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात शनिवार दि. 10 रोजी दु. 4 वा. कार्यक्रम पार पडणार आहे. विद्याप्रसारक मंडळाचा 51 वर्षाचा प्रवास यावेळी उजळणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठीच भव्य इमारतीत अत्याधुनिक सेवेनिशी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली आहे. स्मार्ट वर्गखोल्या, विस्तीर्ण मैदान, उच्चशिक्षित शिक्षक व इतर सोयीनीमुळे केंब्रिज स्कूल शिक्षणसेवेत रुजू झाले आहे.
तव स्मरण आम्हा सतत स्फूर्तीदायी घडो
संस्थापक कै. गजाननराव भातकांडे यांचा जन्मदिन 10 डिसेंबर आहे. ते अनेक संस्थांमध्ये सक्रिय होते. मराठा सहकारी बँकेचे संस्थापक, मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा 15 वर्षे सांभाळली, जत्तीमठ देवस्थान संस्थेचे सभासद व सरपंच म्हणून 5 वर्षे कार्य, पांगूळ गल्लीचे सरपंच म्हणून 1941 पासून 50 वर्षाहून अधिक काळ कार्यरत, वाड्मय चर्चा मंडळाच्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे सभासद, महात्मा फुले वसतीगृहाचे संस्थापक, अध्यक्ष म्हणून कार्यरत, अंधश्र्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्य, शैक्षणिक सहभाग, मराठा मंडळ संस्थेवर मँनेजिंग कमिटी सदस्य म्हणून त्यांनी काम केले.
जिल्हा स्कूल बोर्ड व द. म. शिक्षण मंडळ कार्यकारिणीवर सदस्य, बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीच्या कार्यकारिणीवर सदस्य, मराठी प्राथ. शाळा क्रमांक 1 व 2 या शाळा सुधारणा कमिटीचे चेअरमनपद आणि अनेक वर्षे कार्यकारिणीवर सदस्य, 1970 साली विद्दा प्रसारक मंडळाची स्थापना, बालवाडीपासून प्रारंभ, असोसिएशन फॉर दि ब्लाईंड या संस्थेच्या कार्यकारिणीवर अनेक वर्षे सभासद म्हणून ते कार्यरत होते.
जन्मदिनी 1970 साली स्थापन झालेल्या विद्याप्रसारक मंडळाचा आतापर्यंतचा प्रवास या सोहळ्यातून उजळणार आहे. कै गजानराव भातकांडे यांचे कार्य स्फूर्ती देणारे आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून हा सोहळा 10 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यानी केले आहे.