बेळगाव : मंगळुर येथे कर्नाटक पदवीपुर्व महाविद्यालयीन राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक यांनी लक्षणीय कामगीरी करीत 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक पटकावित त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े मंगळुर येथे वैभवी बुद्रुक ही 200 मी. धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण, तर 400 मी. अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांकसह कांस्यपदक पटकावले व अपूर्वा नाईक हिने 100 मी. अडथळा शर्यतीमध्ये द्वितीय क्रंमाकसह रौप्यपदक पटकावले. या दोघी आरपीडी विद्यालयात कॉमर्स प्रथम वर्षात शिकत असुन याना महाविद्यालयाचे प्राचार्य मेलद यांचे प्रोत्साहन तर देवेंद्र कुडची यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleसदर्न कमांड अडव्हेंचर चॅलेंज कप स्पर्धा
Next Article युनियन जिमखाना अंतिम फेरीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.