तीन विद्यार्थीनी गंभीर : चोवीस किरकोळ जखमी
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरालगतच्या कबनूर ( ता. हातकणंगले ) एका खासगी क्लासच्या विद्यार्थिनींची शिर्डी व औरंगाबाद येथे गेलेल्या शैक्षणिक सहलीच्या खासगी आराम बस बारामती शहरालगतच्या मौजे पाहुणेवाडी गावाशेजारी पुलावरून खाली कोसळली. यामध्ये २७ विद्यार्थी जखमी झाले असून, यातील तीन विद्यार्थिनीं गंभीर तर 24 विद्यार्थिनीं किरकोळ जखमी झाल्या आहेत. या सहलीच्या बसला माघारी परतताना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
कबनुर (ता.हातकणंगले) येथील सागर नावाच्या खासगी क्लासच्या इयत्ता ८ वी ते १० वी च्या ४९ विद्यार्थीनी, ५ शिक्षक असे शैक्षणिक सहलीला गेले होते. हे सर्व जण २८ डिसेंबर रोजी यशोदा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आराम बसमधून औरंगाबाद, अजिंठा वेरूळ, शिर्डी, शनी शिंगणापुर येथे सहलीला गेले होते. सहलीला गेलेले सर्व विद्यार्थी-शिक्षक सहल करून शुक्रवारी रात्री गावाकडे परत येत असताना बस बारामतीच्या पुढे मौजे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावरील एका पुलावरून खाली कोसळली. यामध्ये २७ जण जखमी झाले असून, यातील तीन विद्यार्थिनीं गंभीर झाल्या आहे. या तीन विद्यार्थिनींतच्या हातास फ्रॅक्चर व चेहऱ्यास जखमा झाल्या आहेत. सर्व जखमी विद्यार्थींनींवर बारामती येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती समजताच आमदार रोहित पवार यांनी त्वरित रुग्णालयात धाव घेऊन जखमी विद्यार्थीनीची विचारपूस केली.