ब्रेकअपमुळे होता नाराज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत आदर्शनगरमध्ये ब्रेकअपमुळे नाराज एका युवकाने एका युवतीवर चाकूने 6 वार केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर जखमी युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आरोपीचे नाव सुखविंदर असून त्याला हरियाणाच्या अंबाला येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
पीडित युवती ही दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत आहे. 5 वर्षांपूर्वी तिची सुखविंदरसोबत मैत्री झाली होती. परंतु तिच्या कुटुंबीयांना तो नापसंत असल्याने तिने त्याच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. याचमुळे नाराज झालेल्या सुखविंदरने युवतीला भेटण्यासाठी बोलाविले होते. युवती त्याला घरानजीकच्या एका गल्लीत भेटण्यासाठी गेली होती. यादरम्यान सुखविंदरने तिच्यावर चाकूने अनेक वार केले आहेत. हल्ल्यानंतर सुखविंदरने पळ काढला होता. परंतु तो अंबाला येथू लपून असल्याचे कळल्यावर पोलिसांनी तेथे जात त्याला पकडले आहे.