स्थानिकांनी कॅफे पडला बंद ; पोलीस मुख्यालयाशेजारील प्रकार
प्रतिनिधी/ सातारा शहर
शहरातील बंदिस्त कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठविला होता, त्याबाबत पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई काही झाल्याचे आर्जपर्यंत दिसून आले नाही. मात्र मंगळवारी अशाच बंदिस्त पॅफेमध्ये अश्लील चाळे सुरु असताना स्थानिक नागरिकांनी पॅफेमध्ये घुसून सदर प्रकार बंद पडून पॅफे बंद केला. त्यामुळे शहरात अशा प्रकारे पॅफेच्या बंदिस्त दाराआड सुरु असणाऱया घटनांवर व पॅफे चालकावर पोलीस प्रशासन कधी कारवाईचा बडगा उगारणार ? असा प्रश्न शहरवासियांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहीले आहे.
सदर घटनास्थावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ येथील मुख्य रस्त्यावरील एका बंदिस्त कॅफेमध्ये कॉलेज युवक व युवतीचे अश्लील चाळे होत असल्याबाबत वारंवार सभोवतालच्या नागरिकांना दिसून आले होते. मात्र मंगळवारी कॉलेज युवतींची ये-जा वाढत असल्याचे पाहून नागरिकांनी थेट कॅफेत धडक दिली. यावेळी कॅफेमधील बर्थडे हॉलमध्ये नागरिकांना कॉलेज युवक-युवती अश्लील चाळे करताना आढळले. नागरिकांनी युवक-युवतींना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढला. मात्र कॅफे चालक युवक गर्दीच्या तावडीत सापडल्याने जमावाने त्याला चोप दिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यास चांगलीच समज देवून कॅफेला कुलूप लावण्यास सांगितले.
शहरातील अनेक ठिकाणी अशा स्वरुपाच्या पॅफेचे पेव फुटले असून यामध्ये अनेक छोठय़ा-मोठय़ा घटना घडत असतात. एकादी मोठी घटना घडल्यावरच सर्वांची वरात पोलीस स्टेशनच्या दारात जात असते. मात्र सदर पॅफेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सदर बंदिस्त कॅफेमुळे युवापिढी भरकटली जात असून गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यामुळे सदर घटनांवर पोलीस प्रशासनाने बारकाईन वॉच ठेवणे गरजेचे आहे. तसेच शहरात अशा प्रकारे सुरु असणाऱया बंदिस्त कॅफेवर पोलिसांनी कारवाईच बडगा उगारुन पॅफे बंद करण्याची मागणी अनेक वेळा काही सामाजिक संस्था, राजकीय पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.
अंधाऱया कॅफेत होताहेत अत्याचार
काही दिवसांपूर्वी वाई शहरातील एका अश्याच बंदिस्त कॅफेमध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यात पोलिसांनी तातडीने एका संशयितास ताब्यात घेऊन कारवाई केली. मात्र या निमित्ताने असा प्रश्न निर्माण होतो की, असे कित्येक अत्याचार अंधाऱया कॅफेमध्ये झाले असतील मात्र बदनामीच्या भीतीने काहींनी पोलीस स्टेशनची पायरीच चढली नसल्याने कॅफेबाबत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. परंतु कॅफेचा नावाखाली बंदिस्त कंपार्टमेंट बनवून त्यात युवा पिढीला मोकळं सोडायच, मग यात काय होणार हे जगजाहीर आहे. प्रशासनाने अशा अंधाऱया आणि बंदिस्त कॅफेवर कारवाई करून ते त्वरित बंद करावीत, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.
डॅशिंग पोलीस अधीक्षक लक्ष देणार का.?
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे कारवायांचा धडाका लावला आहे. जुगार, मटका, दुचाकी चोरी, घरफोडय़ा अश्या अनेक प्रकरणाबाबात कारवाया केल्या असून जुन्या प्रलंबित केसेस ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळे डॅशिंग पोलीस अधीक्षक म्हणून ओळख असलेले समीर शेख युवा पिढीला बरबाद करत असलेल्या या बंदिस्त कॅफेवर कारवाई करणार का ? असा सवाल पालक वर्गातून होत आहे.