क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कॅम्प येथील युनायटेड गोवन रिकरेशन क्लबतर्फे आयोजित आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
कॅम्प येथील युनायटेड गोवनच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे इग्नेशियस मस्करन्स, विलियम मेनेजिस, जॉर्ज रॉड्रिगस, प्रशांत हिरेमठ व सुनील कल्याणपुर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धे 20 शाळेतून 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे 4 माहेश्वरी अंध शाळेच्या विद्यार्थ्यानी या स्पर्धेत भाग घेतला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी पहिली फेरी पूर्ण झाली असून शुक्रवारी अंतीम फेरी व बक्षीस वितरण होणार आहे.