बेळगाव : आंतरराष्ट्रीय मिसेस गॅलेक्सी खिताब विजेती व प्रसिद्ध भारतीय मॉडेल चाहत दलाल आज अन्नोत्सवात ‘सुपर वुमन’ स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे.
चाहत दलाल ही मिसेस गॅलेक्सीचे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. चाहत एक पायलट, एक उद्योजिका, एक मॉडेल, एक डी जे, एक प्रभावशाली महिला व एक उत्कृष्ट वक्ता म्हणून देशभरात ओळखली जाते. ती नेहमीच सामाजिक समस्या हाताळण्यास आणि त्याबाबत जागरूकता करण्यासाठी उत्सुक असते.
आपलं शरीर हे मंदिर आहे आणि त्याच्याशी आदरानं वागलं पाहिजे. तसेच सौंदर्य व व्यक्तिमत्व हे आपलं वागणं, बोलणं, विचार कसे आहेत आणि ते कशा पद्धतीने सादर करता यावर ठरतं, असं सौंदर्याबाबत चाहत यांचं ठाम मत आहे.