बेळगाव सारथीनगर येथील फातिमा मशिदीला वक्फ बोर्डने महानगरपालिकेच्या आदेशावरून टाळे ठोकले आहे.
लोकवस्तीत अनधिकृतरित्या ही मशीद बांधल्याचे आरोप आठवड्यापुर्वी हिंदू संघटन आणि भाजप नेत्यांनी केला होता. आता महानगरपालिकेने वक्फ बोर्डला फातिमा मशिदीला टाळे ठोकण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून मशिदीला टाळे ठोकून त्या परिसरात सुरक्षेसाठी केएसआरपी तुकडी तैनात करण्यात आली आहे.