शशी कपूर यांचा नातू जहान करणार पदार्पण
हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात तयार ‘फराज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाद्वारे रणवीर आणि करीना कपूरचा चुलत भाऊ जहान कपूर बॉलिवूडमध्ये स्वतःचे पदार्पण करणार आहे. जहान हा दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा नातू आहे. हंसल मेहता यांचा हा चित्रपट 2016 मध्ये ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बेतलेला आहे. दहशतवाद्यांनी ढाका येथील कॅफेत अनेक जणांची निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्यादरम्यान एक तरुण दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी निडरपणे उभा राहिला होता. या चित्रपटाची कहाणी याच तरुणावर आधारित आहे.
‘फराज’ची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने अत्यंत आनंदी आहे. ही एका युवकाची कहाणी असून जो माणुसकीकरता द्वेष आणि दहशतवादाच्या विरोधात उभा राहिल्याने जहानने ट्रेलर शेअर करत म्हटले आहे. हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातून परेश रावल यांचा पुत्र आदित्य देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार, साक्षी भट्ट, साहिल सहगल आण मजाहिर मंदसौरवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात जहान कपूर, आदित्य रावल यांच्यासोबत जूही बब्बर, आमिर अली, सचिन लालवानी, पलक लालवानी आणि रेशम सहानी हे कलाकार दिसून येणार आहेत.