Winner of Vengurla Journalists Balshastri Jambhekar Cup Cricket Tournament
एडमिशन पुरस्कृत व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे आयोजित स्पर्धा जल्लोषात संपन्न
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला. तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता संघ ठरला. या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत वेंगुर्ले संघाचा खेळाडू हर्षल परब याने स्पर्धेच्या मालिकावीर तसेच अंतिम सामन्याचा सामनीवर चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कणकवली संघाचा गणेश इस्वलकर, उत्कृष्ट फलंदाज सावंतवाडी संघाचे सचिन रेडकर तर अमोल गोसावी याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.
सावंतवाडी पत्रकार संघ आयोजित व इडमिशन संस्थेच्या माध्यमातून प्रायोजित वया करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, इडमिशन संस्थेचे अधिकारी संदीप नाटलेकर, विनायक जाधव, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, सैनिक बँकेचे व्यवस्थापक सुनिल राऊळ, डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रविण मांजरेकर, आयोजन समिती अध्यक्ष सचिन रेडकर, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवि जाधव, बाळू कशाळीकर, देव्या सुर्याजी, सायली दुभाषी, चित्रा बाबर – देसाई, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, सदस्य हरिश्चंद्र पवार, सागर चव्हाण, अभिमन्यू लोंढे, रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी या स्पर्धेच उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेजी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, अमोल टेमकर, प्रवीण मांजरेकर, संतोष राऊळ, हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी