बेळगाव :अखेर चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकाfनयुक्त सभागृह अस्तिlवात येणार असून, महापालिका प्रशासकीय कालावधीचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. महापौरपदासाठी चार नगरसेविका आणि उपमहापौर पदासाठी 3 नगरसेविका इच्छुक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महापौर-उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या 21 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेस सकाळी 10 पासून प्रारंभ होणार असून, 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर दुपारी अर्जांची छाननी आणि माघारीसाठी वेळ देण्यात येणार आहे. दुपारी 3 वा. सभागृहाच्या बैठकीस प्रारंभ होणार आहे. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत हि निवड प्रक्रिया होणार असून निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त काम पाहणार आहेत. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी मतदानास प्रारंभ होणार आहे.
भाजपचे वर्चस्व
पाहिलांदाच महापालिका निवडणुका राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर झाल्या आहेत. या निवडणुकीत 58 पैकी 35 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 10 नगरसेवक काँग्रेस व 13 नगरसेवक अपक्ष आहेत. महापौरपद सामान्य माfहलांसाठी राखीव आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी महापौरपदासाठी 4 नगरसेविका इÑछुक आहेत. यापैकी एका नगरसेविकेची निवड करण्यासाठी भाजपच्या गटात चर्चा सुरू आहे. महापौर पदासाठी सारिका पाटील, सविता पाटील, दीपाली टोपगी आणि वाणी जोशी यांची नावे चर्चेत आहेत. उपमहापौरपद ओबीसी ब माfहलेसाठी राखीव असून, मराठी भाषिक गटामधील वैशाली भातकांडे आणि भाजपमधून शोभा सोमनाचे व अपक्ष म्हणून अस्मिता पाटील यांच्या
या नावाची चर्चा आहे. त्यामुळे यापैकी महापौर-उपमहापौरपदाÑाी माळ कोणाच्या गळय़ात पडणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. भाजपमधून महापौर-उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 1 उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. मराठी नगरसेविकेला संधी देण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महापौरपदाच्या उमेदवाराची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
प्रशासन सज्ज
महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिकेचे कौन्सिल विभाग सज्ज झाले आहे. महापालिका सभागृहाची स्वछता करून नगरसेवकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता लागणारे अर्ज, आणि इतर कागदपत्रे तयार ठेवण्यात आली आहेत. गुप्त मतदान झाल्यास त्याकाfरता लागणारी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. तसेच विविध अधिकार्यांची नियुक्ती निवडणुकीसाठी केली आहे. महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी सभागृहाची पाहणी करून निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतली. सभागृहाच्या स्थापनेसाठी आणि महापौर-उपमहापौर निवडीकाfरता मनपा प्रशासन सज्ज झाले आहे.