भाजप नेते किरिट सोमय्या हे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. ते कोल्हापूर जिल्हा बॅकेच्या मध्यवर्ती शाखेला भेट देणार आहेत. आज सकाळी सोमय्या हे कोल्हापूरात उतरले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी किरिट सोमय्या यांचे जोरदार स्वागत केले.
माध्यमांशी संवाद साधताना किरिट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभिर आरोप केले. ते म्हणाले “आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा जो 158 कोटीचा दिसत होता तो 500 कोटीहून अधिक आहे.“ असे खळबळजनक आरोप केले आहेत.
शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मुश्रीफ यांनी बँकेलाही सोडलं नाही
पुढे बोलताना ते म्हणाले, “सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यालाही हसन मुश्रीफ यांनी अशा पद्धतीने लुटले की आता त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मी आज कोल्हापूर जिल्हा बँकेला भेट देणार असून ईडीच्या कारवाईची चौकशी आणि पाठपुरावा करणार आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्या आता लक्षात आले आहे की गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या जीवाची ही काळजी करणार नाहीत” असाही खुलासा केला.
“मुश्रीफ यांनी प्रतिज्ञा केली होती की किरीट सोमय्याला कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही. आता त्यांचे पाय कुठे कुठे घसरले आहेत हे दिसत आहे” अशी खोचक टिकाही त्यांनी केली