Malfunction of patrol boat, flashing of LED at sea
गस्ती नौकेत बिघाड, समुद्रात एलईडीचा लखलखाट
केंद्र आणि राज्य शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने कायदेशीररित्या बंदी घातली आहे. मात्र ही बंदी झुगारून एलईडी ट्रॉलरधारक एलईडी दिवे लावून बिनधास्तपणे पर्ससीन मासेमारी करीत आहे. बुधवारी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून समुद्रात अक्षरशः एलईडी दिव्यांचा लखलखाट दिसून येत होता. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी देवगड बंदरात गस्ती नौकेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. गुरूवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होऊन गस्ती नौका गस्तीसाठी उपलब्ध होईल असे मत्स्य अधिकारी म्हणाले.
मालवण / प्रतिनिधी