अहमदाबाद
गुजरातच्या राजकोटमध्ये रविवारी दुपारी 3.21 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता. तथापि, या भूकंपामुळे कोठेही पडझड किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र दुपारच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. यापूर्वी तीन दिवसांपूर्वी दिल्ली, एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.