मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी इंडियाबुल्स रिअल इस्टेटचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात घसरणीत राहिला होता. व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिल्याचा परिणाम समभागावर दिसून आला.
इंडियाबुल्सचा समभाग 7 टक्के घसरत बीएसईवर 56 रुपयांवर खाली आला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याने याचा परिणाम शेअरबाजारात समभागावर दिसून आला.