सुवर्णमंदिरात केली प्रार्थनाः जालियांवाला बागमध्ये हुतात्म्यांना केले नमन
वृत्तसंस्था / अमृतसर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी पंजाबच्या अमृतसरचा दौरा केला आहे. अमृतसरमधील सुवर्णमंदिरात जात त्यांनी प्रार्थना केली आहे. त्यानंतर जालियांवाला बागला भेट देत त्यांनी हुतात्म्यांना नमन केले आहे. अमृतसरमधील दुर्ग्याणा मंदिर आणि श्री रामतीर्थलाही त्यांना भेट दिली आहे. राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांचा हा पहिलाच पंजाब दौरा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुवर्णमंदिराच्या भेटीदरम्यान त्यांचसोबत खासदार गुरजीत औजला दिसून आले. परिक्रमेदरम्यान राष्ट्रपतींना सुवर्णमंदिराच्या इतिहासाबद्दल एसजीपीसी सदस्यांनी विस्तृत माहिती दिली आहे. त्यानंतर त्यांनी जालियांवाला बाग येथे जात हुतात्म्यांना नमन केले आहे. या दौऱयादरम्यान राष्ट्रपतींसोबत राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि एसजीपीसीचे प्रमुख हरजिंद सिंह धामी उपस्थित होते. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडून (एसजीपीसी) राष्ट्रपतींना या दौऱयादरम्यान दाने निवेदनपत्रे सोपविण्यात आली. हरियाणा शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी 2014 ऍक्ट रद्द करण्याची मागणी एसजीपीसीकडून करण्यात आली आहे.