पुणे / प्रतिनिधी :
शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्याशी संबंधित बदनामीकारक व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात आल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
याबाबत चाकणकर म्हणाल्या, राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील, तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद घातला जाईल. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओप्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : धाकधूक वाढली; पुण्यात H3N2 व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळले
म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सध्या राज्यातील वातावरण तापले असून, याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर एसआयटी चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.