प्रतिनिधी / मिरज
शहरातील बोलवाड रस्त्यावरील मांगलेकर कॉलनी येथे भरदिवसा बंद बंगला फोडून चोरटय़ांनी सुमारे 16 ताळे सोन्याचे दागिने आणि सहा हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
हेही वाचा >>>> द्राक्षव्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 9 लाख लुटणारी टोळी जेरबंद
घटनास्थळावरुन तसेच पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बोलवाड रस्त्यावरील मांगलेकर कॉलनी येथे राहण्यास असलेल्या असिफ खलील मुजावर यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप सेंट्रीगच्या सळईने तोडल्याचे दिसून आले. असिफ हे पत्नीला बघ्यासाठी दवाखान्यात गेले असताना ही घटना घडली. याचवेळी खलील यांची मुंबई येथील बहिणही आली होती. सदर बहिणीचे सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने घरातच ठेवण्यात आले होते. दुपारच्या सुमारास बंगला बंद असल्याचे पाहून चोरटय़ांनी सळईने कुलूप तोडून आत प्रवेश केला. व कपाटात ठेवलेले सुमारे 16 तोळे सोन्याचे दागिने आणि पाच ते सहा हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. असिफ मुजावर हे दुपारी घरी परत आल्यानंतर त्यांना चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी याबाबत मिरज शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र श्वान पथक घराभोवतीच घुटमळल्याचे सांगण्यात आले.