नवी दिल्ली : चिनी टेक कंपनी विवो यांनी एक्स 90 ही आवृत्ती भारतीय बाजारात सादर केली आहे. यामध्ये एक्स 90 आणि एक्स90 प्रो या मॉडेलचा समावेश होणार आहे. या आवृत्तीमध्ये स्मार्टफोनला मोठ्या सेन्सरसह 50 मेगापिक्सल पोट्रेट कॅमेऱ्याची सुविधा देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. विवो एक्स 90 हा दोन मॉडेलमध्ये सादर करण्यात येणार आहे. यात 8 जीबी रॅम असणार असून स्मार्टफोन 59,999 रुपयांना तर 12 जीबी रॅम असणाऱ्या स्मार्टफोनची 63,999 किंमत राहणार आहे. यापेक्षा अधिक स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किमत ही 84,999 इतकी राहणार असल्याची माहिती आहे.
- डिस्प्ले : विवो एक्स90 मध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.78 इंच पंच होल कटआउट डिस्प्ले मिळणार
- प्रोसेसर : दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्राईड 13 आधारीत फनटच ऑपरेटिंग सिस्टम राहणार
- बॅटरी : विवो एक्स 90 मध्ये पॉवरबॅक अपसाठी 120 डब्लू वायर्डफास्ट चार्जिंग सपोर्टसोबत 4810 एमएएच बॅटरी मिळणार आहे.