सुळगा (हिं.) ग्रा. पं. माजी सदस्य सुभाष मरूचे : पदयात्रेत आर. एम. चौगुले यांना भरघोस पाठिंबा
वार्ताहर /उचगाव
बेळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये यावेळी म. ए समितीची सत्ता येणार असून कर्नाटक विधानसभेत समितीचा भगवा झेंडा फडकविल्याशिवाय ग्रामीण मतदारसंघातील जनता स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन सुळगा (हिं.) ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष मरूचे यांनी व्यक्त केले. कल्लेहोळमध्ये म. ए. समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी आणि पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व प्रमुख गल्ल्यांमधून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व गावकऱ्यांनी आर. एम. चौगुले यांना भरघोस पाठिंबा देऊन विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला. यावेळी घरोघरी सुवासिनींनी आरती ओवाळून, पुष्पहार घालून आर. एम. चौगुले यांचे स्वागत केले. युवकांनी विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आर. एम. चौगुलेंना आपला भरघोस पाठिंबा व्यक्त केला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पदयात्रा गावातील सर्व प्रमुख गल्ल्यांमधून काढण्यात आली. या पदयात्रेत माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आप्पा जाधव, लक्ष्मण मरूचे, बुद्धाजी खन्नूकर, अशोक पाटील, किरण पाटील, यल्लाप्पा वेताळ, एम. आर. पाटील, बाळू धामणेकर, मल्लाप्पा लामजी, ज्योतिबा बेनके, मोनाप्पा मरूचे, मनोहर कित्तूर, कृष्णा मुतगेकर, मल्लाप्पा वेताळ, चांगदेव वेताळ, मारुती मरूचे, अरुण मरूचे, मष्णू मरूचे यासह गावातील जाणकार, याबरोबरच युवक, युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.