राधानगरी प्रतिनिधी
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुहास निंबाळकर, प्रा, पी एस पाटील, संभाजी आरडे, दिपक शिरगावकर,रवी कदम, नानासो कांबळे, मारुती पारकर, दिपक बचाटे, डॉ, सचिन कांबळे यांच्यासह अनेक शाहू प्रेमीजनता या कार्यक्रमात सहभागी झाले होते.