नोकिया सी 22 मॉडेलचा समावेश : सुरुवातीची किंमत 7,999 रुपये
नवी दिल्ली
एचएमडी ग्लोबल मालकीच्या नोकियाने स्वस्तातील स्मार्टफोन गटात नोकिया सी22 भारतीय बाजारात सादर केला आहे. आयपी52 सर्टिफिकेशनसह सी आवृत्तीच्या स्मार्टफोनचा यामध्ये समावेश आहे. सदरचा फोन हा धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवता येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
नोकिया सी 22 चारकोल, पर्पल आणि सँड कलर पर्यायांसह उपलब्ध आहे. कंपनीने स्मार्टफोनसोबत 2 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
या मॉडेलची किंमत
कंपनीने हा स्मार्टफोन दोन प्रकारात लॉन्च केला आहे. त्याच्या 2 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ही 8,499 रुपये आहे. नोकिया सी 22 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीदारांसाठी उपलब्ध झाला आहे. डिस्प्ले: नोकिया सी 22 मध्ये पिक्सेल रिझोल्यूशन 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे.
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर: फोन कार्यक्षमतेसाठी ऑटोकोअर युनिस्को एससी 986 3 ए प्रोसेसरद्वारे समर्थन करणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13एमपीसह 2 एमपीचा डबल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वॉटर नॉच डिझाइनसह 8 एमपी कॅमेरा असणार आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: कंपनीचा दावा आहे की या स्मार्टफोनमध्ये 3 दिवसांची बॅटरी लाइफ आहे जी 10-वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. तथापि, कंपनीने बॅटरीची क्षमता मात्र उघड केलेली नाही.
कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा पर्याय: या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉकसह फोनच्या मागील पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय आणि 3.5 मिमी जॅकसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.