बेळगाव : हाय व्होल्टेज केबलच्या धक्क्याने सुट्टीत आजोळी आलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मच्छेजवळील नेहरूनगर येथे घडली. मधुरा केशव मोरे (वय 13) असे या मुलीचे नाव असून हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
मूळ येळ्ळूर-राजहंसगड येथे राहणारी आणि सध्या वडिलांच्या कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक असणारी मधुरा ही आपल्या आजोळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आली होती. खेळता खेळता मधुराचा हात हाय व्होल्टेज केबलला लागला आणि पाहता क्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला.
मागील दोन वर्षांपासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज एका मुलीला जीव गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.