मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १६ व्या विधानसभासाठी मंगळूरचे आमदार यु टी खादर फरीद यांचे नाव प्रस्तापित केले. उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. विधानसभेच्या नूतन सभापतीपदी यू.टी. खादर फरीद यांना सर्वानुमते नियुक्त करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व इतर सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.