वृत्तसंस्था ~ इस्लामाबाद
पाकिस्तानचा यंदाचा अर्थसंकल्प 4 लाख कोटी रुपयांचा असेल असे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. हा देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असून महागाईने कळस गाठला आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची गंभीर टंचाई अद्यापही आहे. अशा परिस्थितीत हा देश संरक्षणावर सर्वाधिक, अर्थात 52 हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. पाकिस्तानने यंदाच्या आर्थिक वर्षात 3.5 टक्के विकासदराचे ध्येय ठेवले आहे. तथापि. ते पूर्ण होणार नाही, असे मत पाकिस्तानमधीलच अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. विकास कार्यांवर 32 हजार कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.