सावंतवाडी : प्रतिनिधी
येत्या १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे . त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणेश मूर्ती शाळा येथे आता लगबग सुरू झाली असून मूर्ती रंगवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बाप्पाचे निरागस रूप पाहण्यासाठी गणेशभक्त आता सज्ज झाले आहेत .