बंगळूर येथील एका खाजगी कंपनीत डिझायनर म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष वामन सुतार (वय,३३) या युवकाचा हुबळी जवळ अपघाती मृत्यू झाला आहे. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी कि, आशिष यांच्या साठी त्यांच्या घरी वधू संशोधनाचे कार्य सुरू होते. त्यानिमित्त आशिष हा बंगळूरहुन गडहिंग्लज कडे येत होता. आज दि.२९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आशिष आपल्या दुचाकी वरून हुबळी नजीक आला असता त्याच्या दुचाकीला जोरदार अपघात झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. आशिष हा बंगळूर येथील खाजगी कंपनीत सिनिअर डिझायनर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत होता. आशिष हा मूळचा कानोली ता – आजरा येथील असून गेल्या काही दिवसा पासून गडहिंग्लज शहरातील भगतसिंह रोड परिसरात राहत होता. त्यामुळे गडहिंग्लजसह कानोली परिसराला या अपघातामुळे धक्का बसला आहे. आशिष याच्या मागे आई,वडील,भाऊ,भावजय असा परीवार आहे.
Trending
- Breaking : मुंबईमध्ये धुळीचे वादळ…होर्डिंग कोसळून ३ ठार, कित्येक लोक अडकले; बचावकार्य सुरू
- मुंबईमध्ये धुळीचे वादळ…दोन ठिकाणचे होर्डींग्ज पडले…बचावकार्य सुरू
- ऱात्रीस खेळ चाले…म्हणत मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीयो संजय राऊतांकडून व्हायरल!
- तिकीट लावून तमाशाचे खेळ करण्याचे दिवस संपले! कवलापूरच्या प्रसिध्द ‘काळू बाळू ‘यांची पाचव्या पिढीचे तमाशात आगमन
- मतदार ओळखपत्र तपासतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप उमेदवार माधवी लता यांच्याविरोधात गुन्हा दाखल
- काँग्रेस गरीब घरातील महिलांना १ लाख रुपये देणार : सोनिया गांधी
- शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकूलाचे काम अंतिम टप्प्यात; मॅटवरील कुस्तीची दोन मैदाने तयार
- गव्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी; चारचाकीचे मोठे नुकसान