ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या नागपाडा परिसरातील चायना बिल्डिंगला आज सकाळी आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आदिल कुरेशी (वय 20), निशा देवी (वय 32), चंदादेवी (वय 60), अनिया (वय 2), मोहनराम (वय 70) अशी आगीतील जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपाडा येथील बगदादी कपांउंडमध्ये असलेल्या चायना बिल्डिंगमध्ये आज सकाळी आग लागली. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. मात्र, कामाठीपुरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी येण्यास अडथळा येत होता. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
या आगीत जखमी झालेल्यांमध्ये एका दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.