ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दीपिकाने जेएनयूतील तुकडे-तुकडे गँग आणि अफझल गँगला पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजपचे नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी तिच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी दीपिकाच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले. यानंतर सोशल मीडियावर #boycottchhapaak हा हॅशटॅग टेंड होताना दिसत आहे.
या सगळय़ाविषयी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रसारमाध्यमांकडून विचारणा करण्यात आली. दिपिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे आम्ही तिच्या सिनेमाला बॉयकॉट करत नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
ते म्हणाले, हा लोकशाही देश आहे. देशातील कोणताही व्यक्ती, कलाकार कुठेही जाऊ शकतो. स्वतःचे विचार मांडू शकतो.