ऑनलाईन टीम / बगदाद :
इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इराणने पुन्हा एकदा अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याची माहिती मिळत आहे.
सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असून, दोन्ही देशांकडून अण्वस्त्र आणि रॉकेट हल्ले वारंवार होत आहेत. मंगळवारीही इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यापूर्वीही इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर 34 सैनिक जखमी झाल्याचे त्यांनी मान्य केले होते.
इराणकडून अमेरिकेच्या बलाद येथील सैन्यस्थळावरही 8 रॉकेट डागली होती. यामध्ये दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱयांचा मृत्यू झाला होता.