मडगाव पालिका मंडळ बैठकीत ठराव
प्रतिनिधी/ मडगाव
सोनसडा यार्डातील प्रकल्पात पडून असलेल्या कचऱयाची इनर्ट की एक्सक्मल्युडेड ही वर्गवारी निश्चित झालेली नसल्याने मोठय़ा प्रमाणात कचरा पडून राहिला आहे. त्यामुळे प्रकल्पात कचरा नेणे शक्मय होणार नाही. म्हणून सरकारने हस्तक्षेप करून सदर प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन महामंडळ?ाने हाती घ्यावा असे सूचित करणारा ठराव शुक्रवारी पार पडलेल्या मडगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही खास बैठक पार पडली. सोनसडा प्रकल्पात कचऱयावर प्रक्रिया करून इनर्ट कचरा राहून गेल्यास पालिकेने त्याची उचल करावी आणि जर एक्सक्मल्युडेड कचरा आढळला, तर फोमेन्तो कंपनीने त्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे, असे करारात स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर कचऱयाचे नमुने नेले होते. परंतु अजूनही त्याचा अहवाल सादर केलेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 7 दिवसांत अहवाल सादर करावा असा आदेश मागील सुनावणीच्या वेळी सत्र न्यायालयाने दिलेला आहे, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
कचऱयाची वर्गवारी निश्चित न झाल्याने कचरा उचलणे राहून गेले आहे. त्यामुळे प्रकल्पात कचऱयाचे प्रमाण वाढतच जाऊन यापुढे कचरा टाकणे शक्मय होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारला वरील ठराव पाठविण्याचे तसेच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाला सदर प्रकल्पाचा ताबा देण्याचेही ठरविण्यात आले.
सोनसडय़ासंदर्भातील खटल्यातील मागील सुनावणीच्या वेळी फोमेन्तोने सोनसडा प्रकल्पाचा ताबा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सुपूर्द करण्यास ते राजी आहोत, मात्र न्यायालयाचा यासंदर्भातील निवाडा येईपर्यंत संरक्षण मिळेल याची हमी देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यास अनुसरून वरील प्रकारचा ठराव घेणे शक्मय असल्याचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी पालिका मंडळाच्या नजरेस आणून दिले.
खत वा टाकावू कचऱयाचे ट्रक कधी दिसले नाहीत
नगराध्यक्षा नाईक यांनी सोनसडा प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे नजरेस आणून दिले. मात्र फोमेन्तोने करारानुसार कचऱयावर प्रक्रिया करण्यात येत असल्याचे दावे केलेले असले, तरी प्रकल्पात निर्माण झालेल्या खताचे वा राहून जाणाऱया कचऱयाचे ट्रक सोनसडा प्रकल्पातून खाली उतरल्याचे कधी दिसून अ?ालेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आवश्यक यंत्रणा बसविण्याचा निर्णय
दैनंदिन ओल्या कचऱयावर बायोमिथेनेशन प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी दोन ठिकाणी यंत्रणा उभारण्याचा पालिकेने यापूर्वी निर्णय घेतला होता. 14 व्या वित्त आयोगाकडून आलेला सुमारे 27 लाख रुपयांचा निधी पडून असून त्याचा वापर करून ही यंत्रणा बसविण्याचा पालिकेचा विचार असल्याचे नगराध्यक्षा नाईक यांनी नजरेस आणून दिले. नगरसेवक रूपेश महात्मे यांनी यासंदर्भात कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होण्याची गरज असून त्यासाठी दोन नव्हे, तर आणखी यंत्रे बसविण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यानुसार जागा निश्चित करून आवश्यक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
14 व्या वित्त आयोगाचा निधी वापरात आणण्यास एवढा विलंब का झाला असा सवाल नगरसेविका सूचिता मळकर्णेकर यांनी उपस्थित केला. विकासकामे मार्गी लावण्यासाठी घेतले जाणारे ठराव हा फार्स ठरू नये असे त्यांनी स्पष्ट केले. दोन महिनेच शिल्लक राहिले असून त्यानंतर 15 वा वित्त आयोग अस्तित्वात येईल असे काही नगरसेवकांनी नजरेस आणून दिले. त्यावर पालिका संचालकांनी पंधरवडय़ापूर्वी भेट दिली असता सदर निधी वापरावा असे सूचित केले होते याकडे नगराध्यक्षांनी लक्ष वेधले. मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी पालिका अभियंता दिनीज डिमेलो यांच्याकडून सदर विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन दिले.