ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य आणि दिव्य असे राम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली. या ट्रस्टमधील एक विश्वस्त कायम दलित समाजातील असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिली.
ते म्हणाले, या ट्रस्टमध्ये एकूण 15 विश्वस्त असतील. त्यांपैकी एक विश्वस्त नेहमीच दलित समाजातील व्यक्ती राहणार आहे.
दरम्यान, सामाजिक सौहार्द मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टबाबत माहिती दिली.