दिग्दर्शक शशांक खेतानच्या आगामी चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन करणार आहे. ही एक प्रेमकहाणी असणार आहे. नुकताच कार्तिकने या चित्रपटासाठी होकार दिला आहे. अजून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आणि इतर कलाकारांची निवड करण्यात आलेली नाही. याचवर्षी या चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार आहे. तोपर्यंत शुटिंग लोकेशन्स आणि इतर सुविधा यांची जुळवाजुळव करण्यात येईल. शशांक खेतानने काही दिवसांपूर्वी मि. लेले या चित्रपटाची घोषणा केली होती. पण कलाकारांच्या व्यस्त शेडय़ुलमुळे हे शुटिंग रखडले आहे. या चित्रपटात वरुण धवन, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सध्या कार्तिक भूलभुलैय्या 2 या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीचीही भूमिका आहे.
Previous Articleपडझडीनंतर शेअरबाजार सावरला
Next Article कालानुरूप ‘हे’ पाच बदल करण्याची गरज