प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण राज्यामध्ये कोरोना नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही माहिती द्यायची असेल तर त्या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्यासाठी फोन क्रमांक 0831-2407290, 2424284 यांना संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे. कोरोनाबाबत सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना संशयित रुग्णांची माहिती देण्यास अनेक जण घाबरतात. बाहेरून आलेल्या लोकांची माहितीदेखील दिली जात नाही. यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात एक कक्ष स्थापन करून त्या ठिकाणी माहिती संग्रहित केली जाणार आहे.
माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलीस त्या परिसरात जाऊन कोरोना संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. बरेचजण अजूनही कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी पुढे येण्यास तयार नाहीत. यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोणतीही समस्या असल्यास त्या ठिकाणी कोणीही संपर्क साधू शकते, असे आवाहन करण्यात आले आहे..