प्रतिनिधी/ कुडचडे
बऱयाच दिवसांनंतर कुडचडे बाजारात वर्तमानपत्रे उपलब्ध झाल्यामुळे वाचकांनी आनंद व्यक्त केला आहे. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चहा जात नाही असे अनेक वाचक आहेत. तसेच कित्येक वाचकांना ‘तरुण भारत’ हातात घेतल्याशिवाय करमत नाही. अशा वाचकांच्या चेहऱयावर कुडचडे बाजारातील वर्तमानपत्र विक्रेत्याच्या दालनावर ‘तरुण भारत’ पाहिल्यानंतर समाधान दिसून आले. लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्रे मिळत नसल्याने राज्यातील कोरोना विषाणूशी संबंधित तसेच अन्य घडामोडींची सत्य परिस्थिती कळत नव्हती. खास करून सरकारद्वारे घोषित विविध सूचना जरी टीव्हीवरून प्रसारित होत असल्या असल्या, तरी त्या ‘तरुण भारत’मधून वाचल्यावरच समाधान होत असते, अशी प्रतिक्रिया कुडचडेतील ‘तरुण भारत’चे वाचक प्रशांत नाईक यांनी दिली.