प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यातील 14 निवारागृहांमध्ये राज्यातील 203 आणि परराज्यातील 496 अशा 700 जणांना इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, महापालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 21 परराज्यातील 5 अशा 26 जणांचा समावेश आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत येथे राज्यातील 16 परराज्यातील 8 अशा 24 जणांचा समावेश आहे. सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जणांचा समावेश आहे. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी येथे राज्यातील 8 जणांची तर कागल येथील डॉ. आंबेडकर वसतीगृहात राज्यातील 3 परराज्यातील 97 अशा 100 जणांची आणि जयसिंगराव घाटगे विद्यालयात राज्यातील 3 परराज्यातील 44 असे47 जणांची सोय केली आहे.
हातकणंगले येथील निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 77 जण आहेत. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव येथे 109 जण आहेत. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे 51 जण आहेत. राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील 64 जण आहेत. जयसिंगपूर येथील शाळा क्रमांक 1 मध्ये 25 जण आहेत. गडहिंग्लज येथील देवदासी विद्यार्थी वसतीगृहात 11 जण, गगनबावडा येथील माधव विद्यालयात 13 तर समाजकल्याण निवासी शाळा वसतीगृहात 102 जण आहेत. यामध्ये तामिळनाडूमधील 195, कर्नाटकातील 191, राजस्थानमधील 62, उत्तर प्रदेश मधील 29, मध्य प्रदेशमधील 10, पाँडेचरी मधील 2, पश्चिम बंगालमधील 1, केरळमधील 5, बिहार 1 अशा 496 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 203 असे मिळून 699 जणांचा समावेश आहे.