प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ झाली असून तो सहा झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचतच्या कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कात आल्याने एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला तरूणांची नातलग आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, उचतचा तरुण दिल्लीतील तबलिकी जमातच्या मरकजला गेला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करून त्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील महिलेला कोरोना झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सहा वर गेला असून चिंता वाढली आहे.