प्रतिनिधी/ बेळगाव :
लॉकडाऊन कालावधीत सेवा बजावत असणाऱया विविध खात्यातील अधिकारी व कर्मचाऱयांना शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने अल्पोपाहार आणि जेवण देण्याचे कार्य सुरू आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकी असणाऱया काही जणांकडून खारीचा वाटा उचलण्यात येत आहे. वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी इलेक्ट्रिक कंत्राटदार संदीप हुंदरे शक्मय तितकी मदत करत आहेत.
शहापूर पोलीस स्थानकातील अधिकारी तसेच पोलिसांना आणि स्थानकासमोरच असणाऱया हेस्कॉम कार्यालयात (5 क्रमांक) अधिकारी व कर्मचाऱयांना त्यांनी अल्पोपाहार आणि चहाची व्यवस्था केली होते. हुंदरे यांनी स्वत: जाऊन अल्पोपाहाराचे वाटप केले. लॉकडाऊन कालावधीत कार्यरत असणाऱया या अधिकारी व कर्मचाऱयांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे.