मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.
वृषभः लक्ष्मीला अभिषेक करून कुंकुमार्चन करावे, आर्थिक लाभ.
मिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील.
कर्क: प्रेमप्रकरणे निर्माण होतील अथवा प्रेमविवाहाचे योग संभवतात.
सिंह: समजुतीच्या घोटाळय़ामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.
कन्या: अनिवार्य प्रसंगामुळे नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.
तुळ: आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, गडबडीची शक्यता.
वृश्चिक: दांपती दोषामुळे संसारात विघ्ने येण्याची शक्यता.
धनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून दूर राहा.
मकर: नोकर चाकर फसवतील, नातेवाईकांबाबत मध्यस्थी नको.
कुंभ: कटुता सोडा, बोलणे मधुर ठेवल्याने प्रगती साधाल.
मीन: पूर्वी केलेली काटकसर ऐनवेळी उपयोगी पडेल.