165 व्यक्ती घरीच, तर संस्थात्मक विलगीकरणात 71 जण
प्रतिनिधी / ओरोस
जिल्हय़ात आजमितिस 236 व्यक्ती विलगीकरणात असून त्यापैकी 165 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात 71 व्यक्ती दाखल आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 51 रुग्ण दाखल असून आजपर्यंत एकूण 259 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 228 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून 31 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत 2347 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत थालासेमिआच्या 10, डायलेसीसच्या 50 आणि केमो थेरपीच्या एका रुग्णास सेवा देण्यात येत आहे.
घरीच अलगीकरण 0165
संस्थात्मक अलगीकरण 0071
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0259
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0228
पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले नमुने 0001
निगेटिव्ह रिपोर्ट आलेले नमुने 0227
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0031
विलगीकरण कक्षात दाखल 0051
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
शनिवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2347