मात्र सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रयत्नांची गरज, न्यू मार्केटातील दोन दुकाने बंद करण्याची पाळी
प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील गांधी मार्केट व न्यू मार्केटमधील अर्धी-अर्धी दुकाने सोमवारपासून सुरू करण्यात आल्याने ग्राहकांची चांगली सोय झाली असली, तरी सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या बाबतीत अजूनही प्रयत्नांची गरज असल्याचे दिसून आले.
पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी सकाळी मार्केट निरीक्षकांना घेऊन दोन्ही बाजारांची पाहणी केली. न्यू मार्केटमधील एका चहा पावडरच्या दुकानदाराने मास्क न घातल्याचे आढळून आल्याने तसेच त्याने अधिकाऱयांशी हुज्जत घातल्याने सदर दुकान बंद ठेवण्याचे निर्देश मुख्याधिकाऱयांनी दिले. त्याचप्रमाणे न्यू मार्केटमधील एका अंडीविपेत्याच्या स्टॉलवर गर्दी आढळून आली. सोशल डिस्टन्सिंग न राखल्याने सदर दुकान बंद करण्यास सांगण्यात आले.
गांधी मार्केटमध्ये मुख्याधिकारी व उर्वरित पथकाने पाहणी केली त्यावेळी गांधी मार्केटमधील विक्रेत्यांचे नेते राजेंद्र आजगावकर त्यांच्यासोबत होते. मुख्याधिकाऱयांनी गांधी मार्केटमधील विक्रेते सोशल डिस्टन्सिंग चांगल्या प्रकारे पाळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे आजगावकर यांनी सांगितले. गांधी मार्केटमध्ये सकाळी 10 वा. सदर पाहणी करण्यात आली. मात्र सकाळी 7 पासून नियमानुसार फक्त पिवळय़ा रेषेतीलच नव्हे, तर पिवळय़ा तसेच पांढऱया रेषेतील दुकानेही चालू असल्याचे दिसून आले होते. नंतर फक्त पिवळय़ा रेषेतील दुकानेच खुली ठेवण्यात आली.
मार्केट निरीक्षकांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी
दरम्यान, मार्केट निरीक्षक व त्यांच्या हाताखालील कामगारांच्या कार्यपद्धतीबद्दल सध्या नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मार्केट निरीक्षक व कर्मचारी कार्यालयात बसून राहत असतात. या सर्वांनी बाजारपेठांमध्ये फेरफटका मारून सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल याची काळजी घेणे व देखरेख ठेवणे आवश्यक आहे. मात्र तसे केले जात नसल्याने काही दुकानांत गर्दी पडत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.