गरोदर माता, वृद्ध, अपंगांना ठेवणार गृह अलगीकरणात : जिल्हाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात चाकरमान्यांचा ओघ वाढला असून आतापर्यंत 5 हजार 396 व्यक्ती जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. बुधवारी एका दिवसात 1,245 व्यक्ती आल्या आहेत. जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांमधील गरोदर माता, वृद्ध व अपंग यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी दिली.
सध्या जिल्हय़ामध्ये मुंबई, पुणे व अन्य जिल्हय़ातील बाधित क्षेत्रातून येणाऱया व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या प्रवाशांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, पाच वर्षांखालील मुले व त्यांच्या माता, 60 वर्षांवरील वृद्ध, अपंग व दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने अशा व्यक्तींची तपासणी करून अटी व शर्तींच्या अधीन राहून 28 दिवस गृह अलगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
होम क्वारंटाईनांच्या आरोग्याचा पाठपुरावा
गृह अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या अशा व्यक्तींच्या आरोग्याचा पाठपुरावा आरोग्य कर्मचारी यांनी करायचा आहे. तसेच त्यांच्यामध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन केले आहे, त्या व्यक्ती जर उपविभागीय अधिकारी यांनी अधिग्रहीत केलेल्या पेड क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यास इच्छूक असतील, तर इन्सिटंड कमांडर यांच्याशी समन्वय साधून त्या व्यक्तींना पेड क्वारंटाईनमध्ये पाठवावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.
3,697 व्यक्तींची आरोग्य तपासणी
देवगड तालुक्मयातील वाडा येथील कंटेनमेंट झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तीन किलोमीटरच्या या कंटेनमेंट झोनमध्ये वाडा, नाडण आणि पुरळ या गावांचा समावेश होता. 19 पथकांनी 822 घरांमधील 945 कुटुंबातील एकूण 3 हजार 697 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. या तपासणी सर्वेक्षणामध्ये एकही व्यक्ती बाधित झाली नसल्याचे दिसून आले. तसेच देवगड तालुक्यात वाडा येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
1,060 व्यक्ती अलगीकरणात
सद्यसिथितीत जिल्हय़ात एकूण 1 हजार 60 व्यक्ती अलगीकरणात असून 684 व्यक्ती गृह अलगीकरणात, तर 376 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 928 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 852 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 844 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 79 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 118 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत गुरुवारी 6 हजार 163 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात आढळलेल्या आठ कोरोना बाधित रुग्णांपैकी चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून इतर चार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्हय़ात 5,396 व्यक्ती दाखल
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात 13 मे 2020 रोजी 1 हजार 245 व्यक्ती दाखल झाल्या असून 14 मे रोजी अखेर जिल्हय़ात एकूण 5 हजार 396 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातून बाहेर जाण्यासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासनातर्फे 321 पास देण्यात आले.
घरीच अलगीकरण 0684
संस्थात्मक अलगीकरण 0376
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0928
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0852
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0008
निगेटिव्ह आलेले नमुने 0844
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0079
विलगीकरण कक्षात दाखल 0118
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0004
बुधवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 6163