ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मंगळवारी 2091 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 1168 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 16 हजार 954 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 36 हजार 004 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 97 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईत 39, कल्याण-डोंबवली 10, पुणे 8, ठाणे 15, औरंगाबाद 5, सोलापूर 7, मीरा- भाईंदर 5, उल्हासनगर आणि मालेगाव 3, नागपूर आणि रत्नागिरीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये 63 पुरुष आणि 34 महिला रुग्ण आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 3 लाख 35 हजार 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 54 हजार 758 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.