ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत आज दिवसभरात 1150 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 45 हजार 854 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 1518 एवढी आहे.
आज मुंबईत 699 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत 18 हजार 797 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 12 दिवसांवरून 20 दिवसांवर आला आहे. मुंबईतील करोना रुग्णांचा मृत्यू दर 3.3 टक्के आहे.
आज दगवलेल्या 53 रुग्णांमध्ये 28 पुरुष आणि 25 महिला रुग्णांचा समावेश होता. त्यामधील 2 जण 40 वर्षाखालील, 19 जण 40 ते 60 वयोगटातील होते. तर 32 जण 60 वर्षापुढील होते. 53 मृतांपैकी 47 जणांना दीर्घ आजार होते.