ऑनलाईन टीम / कॅनडा :
संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कॅनडामध्ये कोरोना बाधितांची संख्या 95 हजार पार झाली आहे. तर आता पर्यंत 7 हजार पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
कॅनडातील सार्वजनिक आरोग्य एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये 95 हजार 57 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 7773 जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच कॅनडातील क्युबेक प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. क्यूबेक मध्ये 52 हजार 624 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर ओंटारियामध्ये हा आकडा 30 हजार 202 वर पोहचला आहे.
दरम्यान, कॅनडात आता पर्यंत 18 लाख 68 हजार लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यातील साधारण पाच टक्के जनता या महामारीची शिकार झाले आहेत.