ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील चार दिवसात कच्च्या तेलाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत देखील 2.14 रुपयांनी तर डिझेलची किंमत 2.33 रुपये (प्रति लिटर साठी) वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोलची किंमतीत 40 पैसे तर डिझेलच्या किमतीत 45 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 73 रुपयांवरून 73. 40 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमत 71.17 रुपयांवरून 71. 62 रुपये झाली आहे.
कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 75.36, 80.40 आणि 77.43 इतकी वाढली आहे. तर डिझेलसाठी या महानगरांना आता अनुक्रमे 67.63, 70.35 आणि 70.13 रुपये मोजावे लागणार आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता अशा प्रकारे दररोज पेट्रोल – डिझेलच्या किंमती बदलत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना संकटाबरोबरच सामान्यांना महागाईचा झळ सहन करावी लागणार आहे.