जिल्हाधिकाऱयांकडून सातारा जिल्हा परिषदेचे कौतुक, ध्वज निधी संकलनात केले उद्दिष्टपुर्ती
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा लढाऊंचा जिल्हा आहे. अपशिंगे मिल्ट्रीसारखी घरोघरी सैनिकी सेवेत असणारी गावे जिह्यात आहेत. याच जिह्यातून ध्वजनिधी संकलनाबाबत शासकीय कार्यालयांना उद्दिष्ट दिले जाते. ते उद्दिष्ट सातारा जिल्हा परिषदेने 2018 मध्ये पुर्ण केले होते. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचे विशेष अभिनंदन पत्र लिहून केले आहे.
जिह्यातील अनेक सैनिकांनी देशसेवेकरता आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.चीन, पाकिस्तान या दोन युद्धात अनेक सैनिकांनी सहभाग घेतला. कारगिलच्या युद्धात हुतात्मा झाले.जिह्याला देशसेवेची परंपरा आहे. याच परंपरेला साजेसे काम जिह्यातून होत असते. सशस्त्र सेना ध्वजदिन 2018चा निधी संकलनाबाबत जिह्याला उद्दिष्ट दिले गेले होते. 1 कोटी 42 लाख 29 हजार 600 एवढे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी सातारा जिल्हा परिषदेला 29 लाख 99 हजार 972 उद्दिष्ट दिले होते. ते नियोजनपुर्ण कालावधीत निधी संकलित करुन पूर्ण केले. त्याबाबत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचे कौतुक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्र लिहून केले आहे.